Monday, January 21, 2013

RTI lecture 20 jan goa, TARUN BHARAT


माहिती अधिकार उत्तम साधन : मेहेंदळे
पणजी। दि. १९ (प्रतिनिधी)
सरकारच्या कार्यपद्धतीला चांगली गती प्राप्त करून देण्यासाठी माहितीचा अधिकार हे उत्तम साधन आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहेंदळे यांनी केले. इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझीस ब्रागांझाच्या सभागृहात आज आयोजीत केलेल्या माहिती अधिकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांची चांगल्या शासनासाठी भूमिका' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.
मेहेंदळे म्हणाल्या, लोकांना हवी असणारी अचूक माहिती देणे, ही सुशासनाची व्याख्या आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, लोकशाहीमध्ये सामान्य जनतेला काहीच भूमिका नाही, असे वाटू लागले आहे. सध्या सरकारी आणि बिगर सरकारी यामध्ये आरटीआय वॉर घडताना दिसते, हे सुशासनाचे लक्षण नाही. सुशासनाला चांगले यश मिळावे यासाठी या दोन्ही घटकांनी सहकार्याने काम केले पाहिजे.
'आरटीआय'चा वापर करीत असताना माहिती अधिकारी यांना येणार्‍या अडचणी आणि त्यातून साधायचा सुवर्णमध्य याविषयी मेहेंदळे यांनी मार्गदर्शन केले. माहिती अधिकाराअंतर्गत मिळणारी माहिती मोफत देण्याबाबत सरकारने विचार केला पाहिजे, अशी मागणी अँड. सतीश सोनक यांनी अध्यक्षीय भाषणात केली.


                


No comments: