फाळणी होऊ दिली नसती तर (९.७. २०२२)
1. मी त्यावेळी ८-९ वर्षांची होते. जबरपुरच्या एका म्युनिसिपल शाळेत मी चौथीत होते. दसऱ्याची सुट्टी एका दिवसावर आली होती. त्या वर्षी दसरा आणि मुहर्रम एकाच दिवशी होते. २-३ दिवस आधी शासकीय वर्तुळात कदाचित त्याबाबत चर्चा इत्यादि झाली असेल. पण सामान्य माणसाला तो दिवस इतर दिवसांप्रमाणेच होता. दुपारी अचानक हिंदू- मुस्लिम दंगल उसळली. आमच्या शाळेला लगेच सुट्टी देऊन मुलांना गटा- गटाने किंवा आलेल्या पालकांसोबत घरी पाठवले गेले. शिक्षकही गटागटाने जाऊ लागले. कांही उरली सुरली मुले- मुली होती. त्यांना एका मोठ्या शाळेत नेऊन सोडले पण तशी माहिती देणारे शाळेत कुणी थांबले नव्हते. त्या मोठ्या शाळेत मी पण अडकले होते. घरी जाण्याचा रस्ता माहीत नव्हता. आम्ही दोन तीन, दोन तीन मुलं आळीपाळीने गेटच्या बाहेर येऊन कोणी पालक किंवा ओळखीचे येतात का याची वाट पहात थांबलो होतो. कुणी आले तर एक दोघे त्यांच्याबरोबर जात होते.
2. बऱ्याच वेळाने मला सायकलवर माझे वडील येताना दिसले. सुमारे दीड- दोन वाजले असावेत. शाळा सुटण्याची नेहमीची वेळ बारा होती. पण दंगलीची बातमी आल्याने वडील मला घ्यायला सायकलवरून निघाले होते आणि या त्या रस्त्यावर मला शोधत फिरत राहीले होते. रस्त्यांवर दंगलीचे वातावरण होते. कधीही कर्फ्यू लागणार होता. असे असले तरी मुलीची काळजी त्यांना कशी थांबू देणार होती?
3. मला त्यांचा तो घामाने निथळणारा चेहरा अजूनही आठवतो. मला पाहून केवढा मोठा सुस्कारा सोडला असेल सांगता येणार नाही. आम्ही तडक घर गाठले. त्या लहान वयात मला जाणवली दंग्याची भयावहता. दंगे का होतात हे कळण्याचे ते वय नव्हते. तरी याबाबतचे चिंतन नकळत होतच राहिले. पुढे माझा माध्यामिक शाळा, कॉलेज असा प्रवास सुरू झाला. त्यावेळी फाळणी होऊन जेमतेम पंधरा- वीस वर्षे होत होती. खूप जणांच्या मनांत पुन्हा अखंड भारत करायचा हे स्वप्न होत. त्या काळात फाळणी बाबत तसेच अखंड भारताच्या स्वप्नाबाबत वाचलेली पुस्तकं, लेख हे खूप प्रभावी होते. मला वाटत माझ्या पिढीतली मंडळी अजूनही ते स्वप्न जगत असावीत. जरी आयुष्याच्या पुढील धबडग्यांत ते स्वप्न मागे पडत गेल असल तरी ते पुसल गेल नाही.
4. म्हणूनच कांही तरी निमित्ताने कधीही फाळणीचा संदर्भ आला की मनात विचार येई - फाळणी झाली नसती तर? आणि याच पहिल उत्तर असायच - राष्ट्रगीतातील पंजाब सिंध---- हे शब्द खरे राहिले असते. सिंधु नदी व सिंधी सभ्यता आपल्यातून तुटून पडली नसती. पाकिस्तानात तिची जी आस्ते आस्ते दमछाक व विध्वंस होत होता ते झाले नसते. संपूर्ण पाकिस्तानात सिंधी, पंजाबी, बंगाली हिंदुच्या कत्तली होणे, मंदिरे उध्वस्त होणे हे प्रकार चालू झाले होते ते झाले नसते. भारत नावाचे प्राचीन विशाल राष्ट्र असे एका झटक्यात आकुंचन पावले नसते. तिथले पुरातत्वीय पुरावे, तिथले ज्ञानसाठे नष्ट झाले नसते. भारतीय जनता त्या प्रकारांना प्रभावीपणे अडवू शकली असती. वगैरे! एक जाणीव सातत्याने होत राहिली की एका मोठ्या भूभागात भारतीय संस्कृतीचे खच्चीकरण आपण इतक्या सहजपणे होऊ दिले आहे. आजही होऊ देत आहोत. पाकिस्तान किंवा बांग्लादेशमधे हिंदूंचे शिरकाण सुरू असले तरी आपण त्याविरुद्ध ब्र देखील काढत नाही. तो त्यांचा अंतर्गत मामला म्हणून आपण सोईस्करपणे गप्प बसायची सवय लावून घेतली आहे. फाळणी झाली नसती तर निदान आपला निषेधाचा हक्क गमावला नसता.
5. आज हा विषय निघाला की माझ्यासमोर पुस्तकांचा, लेखांचा, म्हणाल तर पुराव्यांचा ढीग टाकला जातो -- हे पहा गांधीचे, जिन्नांचे मत, सावरकरांचे, आंबेडकरांचे, नेहरू, पटेलांचे मत! राज्यकर्ते असलेल्या ब्रिटिश अमलदारांचे मतं! सर्वांनी एक मुखाने सांगितलेले होते की हिंदू आणि मुसलमान एकत्र नांदू शकत नाहीत. म्हणून फाळणी हाच पर्याय आहे.
6. पण या सर्व पुराव्यांना नाकारणारा मोठा पुरावा हा आहे. की जर हिंदू- मुसलमान एकत्र नांदू शकत नाहीत हे इतक्या ठामपणे सर्वांना माहीत होत, कळत होत तर मग फाळणीनंतरच्या भारतात मुसलमान कसे राहिले का राहू दिले?
7. फाळणीनंतर पहिल्या दोन तीन महिन्यांतच हे सिद्ध झाले होते की ते भारताच्या भूभागात एकत्र राहू लागले आहेत, रहाणार आहेत. त्याच वेळी पाकिस्तानसकट पुन्हा एकत्र येण्यासाठी उठाव का झाला नाही? का इथे मागे राहिलेल्या एकाही मुस्लिम नेत्याने तशी मागणी नाही केली? किंवा हिंदू नेत्यांनी? जिनानी नव्हते का कबिलाईंच्या नांवावर पाकिस्तानी सैन्याला भारतात घुसवले? मग तेच नेहरूंनीही करून चालले असते. पुढे लालाबहादुरांच्या काळात भारतीय सैन्य लाहोर पर्यंत पोचले होते. इंदिरा गांधीच्या काळात पूर्व बंगाल मधे पोचले होते. पण प्रत्येक वेळी फक्त राज्यकर्त्यांनी कच खाल्ली की एकूण भारतीय समाजानेच कच खाल्ली म्हणायची? का नाही इथे राहिलेल्या मुसलमानांनी म्हटले की करा पुन्हा भारत- पाकिस्तान एकत्र - आपली गंगा जमनी तहजीब वापरू आणि एकत्र राहू!
8. आज मारे सर्व जण गंगा जमनी तहजीब बोलतात अगदी कांग्रेसपासून तर भाजपापर्यंत! पण पाकिस्तानात किंवा बंगलादेशामधे दंगे होतात आणि हिंदू मारले जातात तेंव्हा त्यांना गंगा जमनी तहजीबचा सल्ला का दिला जात नाही? इथले मुस्लिम त्यावेळी गप्प का असतात? आजही का सांगत नाहीत की पाकिस्तान पुन्हा ताब्यात घ्या, आपण शांततेने एकत्र राहू? हे त्या काळापासून पडलेले प्रश्न आजही तसेच आहेत. आणि हिंदू तरी गप्प का रहातात? स्वसंरक्षणासाठी कधीतरी आक्रामक व्हावे लागते हे ते कसे विसरतात?
9. गीता म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्राणच अस अखंडपणे घोकणारे अजूनही अर्जुनाच्या कार्पण्य दोषालाच धरून आहेत. स्थितोस्मि, गतसंदेहः अशी त्यांची अवस्था येईल का ही शंकाच आहे. पोतराजाप्रमाणे स्वतःला फटके मारून घेण्यातच धन्यता मानणारे कधी कृष्णाला समजून घेतील का?
10 फाळणीचा इतिहास वाचत वाचत 1900 च्या ही मागे गेल्यावर लक्षात आले की ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी ब्रम्हदेश, श्रीलंका. अफगाणीस्तान, तिबेट हे ही भारत या सभ्यतेचेच भागीदार होते. तिथे हिंदू धर्मीय तसेच बौद्ध-शीख- मुसलमान असे सर्वच नांदत होते. आपापसांत कधी भांडत होते तर कधी जमवून घेत होते. प्रसंगी अफगाणिस्तान मधे किंवा काश्मीर खोऱ्यांत मुगल शासकांना केलेले वंशसंहारही होत असत, हिंदुची संख्या कमी होत असे, तरी पण पुन्हा सर्व एकत्र नांदत. याचे कारण की ग्रामीण समाजरचनाच एकमेकांवर अवलंबून अशी असायची. धर्मान्तरण झाले तरी ब्राम्हणांखेरीज इतरांचा वर्ण व्यवसाय संपत नसायचा. पण ब्रिटिश राजवटीने ही सर्व समीकरणे बदलून टाकली. नवीन भाषा, नवी कौशल्ये, नव्या निष्ठा आणि नवीन राजसम्मान. यामुळे नव्या प्रकारच्या फुटीरतावदही बळावला ज्याने हिंदु व भारतीय समाजाला खिळखिळे केले.
11. पुढे स्वातंत्र्यलढा या एका मुद्यावर पूर्ण समाज पुन्हा जवळ येऊ पहात होता पण काहींच्या सत्तालालसेमुळे विभाजन झाले. माझ्या मृतदेहावरच देशाचे तुकडे होतील असे म्हणणाऱ्या गांधींना देखील मनधरणीची भूमिका सोडून कणखर भूमिका कधी घ्यायची ते कळले नाही म्हणूया किंवा कळले तो पर्यंत त्यांचा स्वभावधर्म बदलून त्यातील कणखरपणा निघून गेला होता असे म्हणूया.
13. असो. आता इतके खोलात शिरण्याचे कारण म्हणजे भूतकाळातून भविष्यकाळासाठी आपण काय शिकतो? आतापर्यंत आपण काय शिकलो? आज आपल्या शोजारी दोन प्रमुख देश पाकिस्तान आणि बांगलादेश इथे हिंदूंविरुद्ध गलाकाटू संस्कृती चालू आहे. शिवाय तिथली जनता सामंजस्याकडून आणि सहकार्याकडून समृद्धिकडे या तत्वज्ञानावर विश्वास न ठेवणारी अशी आहे. त्यामुळे तिथे अराजकता, गरीबी ही फोफावली आहेत. याचा थोडा विस्ताराने परामर्श घेऊया.
14. भारतीय- अभारतीय किंवा हिंदू-मुसलमान हा लढा ज्या दोन संस्कृतीमधला आहे त्यातील एक सांगते - मेहनतीने कमवाल तेच खरे धन. दुसऱ्याचे धन कधी घेऊ नका कारण जे तुमचे नाही ते वापरलेत तर ते तुम्हाला स्वतःला आणि समाजाला उत्कर्षाप्रत नेऊ शकत नाही. आचरण शुचिता हा या संस्कृतीचा मोठा भक्कम पाया आहे. दुसरी संस्कृती सांगते की जे तुमचे ऐकत नाहीत, किंवा तुमची सत्ता मान्य करत नाहीत त्यांना काफिर ठरवा. तसे ते एकदा ठरले की त्यांच्याशी लढाई करा. त्यांची संपत्ति लुटा. तो तुमचा अधिकार होतो. मुळात धन या शब्दाच्या व्याख्येपासूनच दोन संस्कृतीतील हा फरक ठळक होत जातो.
15. गेल्या चौदाशे वर्षांचा मुस्लिम इतिहास आणि दोन हजार वर्षांचा ख्रिश्चन इतिहास वाचतांना असे दिसून येते की त्यांनी तलवारीच्या जोरावर नवे – नवे प्रांत किंवा राज्ये जिंकताना तिथली संस्कृती संपवली. इजिप्तमधे नाइलच्या खोऱ्यात फरोहा संस्कृती संपवली. ग्रीको- रोमन युद्धांमधे ग्रीक संस्कृती संपली. रोमनांनी पश्चिमी युरोप काबीज करतांना तिथली टोळ्यांची संस्कृती संपवून ख्रिश्चनिटीची स्थापना केली. कोलंबसच्या मागून अमेरिकेत गेलेल्या युरोपीय देशांनी रेड इंडियन संस्कृती संपवली, तर मुस्लिम खलीफांनी मध्य एशिया मधील इतर संस्कृतींना संपवले. पंधराव्या शतकांत स्पॉनिशांनी इंका व माया संस्कृती संपवली. इराण मधील पारशी संस्कृती संपवून इराकने तिथे मुसलमानी राज्य आणले पण त्यातही सुन्नी शिया असा वाद मुस्लिमांमधे अजून सुरू आहे व तो तलवारीच्या बळावरच निकाली केला जाईल. हे सर्व तलवारीच्या जोरावर झाले.
16. जगातील मुसलमान ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी जनजीवन अस्ताव्यस्त केले, कुटुंबजीवन व शील भ्रष्ट केले, मंदिरांची मोडतोड केली, मूर्तीचे तुकडे तुकडे केले, बाटवाबाटवी करून त्या त्या प्रदेशात मुसलमानी सत्ता स्थिर करण्याचे प्रयत्न केले. मुसलमानी आक्रमण आणि इस्लामी संस्कृती यांचा परिणाम जगात सर्वत्र सारखाच झाला. त्यांना ज्यांनी शक्तीने प्रत्युत्तर दिले ते टिकले, ज्यांनी आपल्या सभ्य वागणुकीचा निकष लावून त्यांच्याशी सामोपचाराची वागणूक केली ते पराभूत झाले. ख्रिश्चनांनी बाटलेल्या धर्म बांधवांना परत स्वधर्मात घेतले आणि इस्लामच्या प्रचाराला पायबंद घातला. हिंदूंनी बाटलेल्या धर्मबांधवांना परत घेतले नाही आणि इस्लामचा प्रचार फोफावण्यास एक प्रकारे सहाय्यच केले.
17. तलवारीच्या जोरावर जगभरातील असलेल्या संस्कृती संपवणाऱ्या मुस्लिमानांना हजार वर्ष प्रयत्न करूनही भारतातील सनातन संस्कृती संपवता आली नाही. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इथे आलेल्या ब्रिटिशांनी हे ओळखून ख्रिश्चिनिटीसाठी वेगळा मार्ग पत्करला. इथल्या हिंदूना सनातनी संस्कृतीचा अभिमान न वाटता ती गांवंढळ, अंधविश्वासी, अवैज्ञानिक वाटावी आणि त्यांनी स्वतःच तिला सोडून द्यावे, व यासाठी आर्थिक निकषांकडे भारतीय समाजाला वळवणे आणि त्यांतही हिंदू-मुसलमान दुही माजवणे हा तो मार्ग होता. त्यांनी एकेक करून भारताचे भाग खण्डित केले. अफगाणिस्तान, ब्रम्हदेश, श्रीलंका हे सर्व सांस्कृतिक माध्यमातून भारताशी जोडलेले होते. अफगानीस्तानमधील भारतीय संस्कृती संपवून तिथेही गलाकाटू तत्वज्ञान येईल याची खबरदारी घेतली. म्हणूनच तिथेही भारतीय संस्कृतीचे समूळ उच्चाटन झाले - जसे दक्षिण अमरिकेमधे इन्का व माया संस्कृतीचे झाले. ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी आपली भारतीय संस्कृती हा अभिमानाचा विषय राहिल्याने तो तलवारीपुढे टिकून राहिला पण तीच संस्कृती अंधविश्वासी आणि टाकाऊ म्हणून भारतीयांनी मान्य केल्यावर तिला समूळ उपटणे सोपे झाले. त्यातच भारताचे तुकडे केल्याने ही प्रक्रिया अधिक वेगाने होईल हा ब्रिटिशांचा कयास आपल्या नेत्यांनी व धार्मिक कट्टरतावाद जोपासणाऱ्या पाकिस्तानने खरा ठरवला.
18. सत्तावन्न मुस्लिम राष्ट्रांचा विचार केला तर त्यामधे तरी किती नागरिक स्वकर्तृत्वाचा विचार करतात? किती शास्त्रज्ञ, चिंतक, साहित्यिक, उद्योजक तिथे आहेत? त्यांच्याकडे आहे ती तेलसाठ्यांमुळे आलेली आर्थिक समृद्धि. त्याउलट पाकिस्तान व बांग्लादेशची लोकसंख्या ही एकेकाळी मूळ भारतीय तत्वज्ञानावर पोसलेली व वाढलेली जनसंख्या आहे. ते त्या संस्कृतीची आठवण ठेऊन तसे वागू शकले असते. कधीकाळी त्या समाजात कबीर, रहीम सारखे विचारवंत होतेच ना। आज त्यांनी लुटालुटीचे, गलाकाटू तत्वज्ञान स्वीकारले आहे, ज्यामुळे त्यांची परिस्थिती खालावत रहाणार आहे हे आता स्पष्ट दिसू लागले आहे.
19. विषयांतर झाले तरी इथे नमूद करावे लागेल की कम्युनिस्ट तत्वज्ञान व कम्युनिस्ट चीनच्या दिखाऊ झगमगाटाला भुलून श्रीलंकेनेही स्वतःचे नुकसान करून घेतले आणि तेच फुकटेगिरीचे तत्वज्ञान भारतातही शिरलेले असून त्याविरुद्ध आपण वेळीच सावध झाले पाहिजे. मेहनतीचे धन हेच खरे धन, लुटून किंवा फुकट आलेले ते आपले नाही हे तत्वज्ञान आपण विसरता कामा नये.
20. पाकिस्तान देण्याने हिंदुस्थानातील मुसलमानांचा प्रश्न संपेल असे ज्यांना वाटले त्यांना मुसलमानांचा प्रश्न समजलाच नव्हता. पाकिस्तान झाले, पण राहिलेल्या हिंदुस्थानात मुसलमानांनी किती नवनवीन प्रश्न निर्माण केले आहेत ते आपण प्रत्यही पहातच आहोत. मुसलमानांचा प्रश्न हिंदुस्थानातच नाही, तो जगात सर्वत्रच आहे आणि तो सोडविण्यासाठी या प्रश्नाचे सखोल चिंतन आणि ते ही वैश्विक पातळीवर या प्रश्नाचा आढावा घेऊन करणे आवश्यक आहे. इस्लामपुढे ज्ञान, विज्ञान, औद्योगिक क्रांती, साम्यवाद, पुरोगामी विचार, सर्वधर्मसमभाव, सामंजस्य हे सर्व शब्द अर्थहीन ठरले आहेत ही वस्तुस्थिति नजरेआड करता येणार नाही.
21. धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली. फाळणी पूर्वी जसे दंगे भारतात मुस्लिम समाजाकडून घडवण्यात येत असत. तशाच प्रकारच्या दंगली स्वतंत्र भारतातही १९४७ नंतर मोठ्या प्रमाणावर घडवून आणल्या जात आहेत. २६/११ सारखे मोठे हल्ले भारताला झेलावे लागले आहेत. फाळणी झाली परंतु फाळणी ज्या कारणाने झाली तो प्रश्न त्यामुळे सुटला आहे का? याचे चिंतन स्वतंत्र भारतात होण्याची आहे. मागच्या ७० वर्षात हिंदुस्थानात राहिलेल्या मुसलमानांची भीड बरीच चेपली. पाकिस्तानात हिंदूंना कितीही त्रास झाला तरी भारतात आपल्याला काहीही होत नाही याची त्यांना खात्री झाली. पाकिस्तानातील अशा अत्याचारांची काही प्रतिक्रिया येथे झाली तर भारतातील कॉँग्रेसी सरकारे व स्वतःला निधर्मी म्हणून घेणारे पक्ष मुसलमानांना संरक्षण देतात असा अनुभव आल्यामुळे मुसलमान केवळ निर्धास्तच बनले असे नाही तर उद्दंड होऊ लागले. फाळणीपूर्व काळातील उर्दूभाषेचा आग्रह, वाद्ये न वाजवू देणे, गोहत्या, वंदे मातरम् विषय पुन्हा वर येऊ लागले . फाळणी नंतरच्या काळात मुसलमान क्रमाक्रमाने अधिकाधिक दंगली करू लागले आणि इस्लामचा कडवा प्रचार करणाऱ्या तबलिक, तालिबान, जमाते इस्लामी, इत्तेहादुल मुसलमीन अशा संस्थांचे काम खेड्यापाड्यात पसरू लागले. इराणच्या खोमेनीने 'फंडामेंटॅलिझचा पुकारा करण्यापूर्वीच हिंदुस्थानात तो सुरूही झाला होता; आणि या फंडामेंटॅलिझमचा त्रास हिंदूंना आणि सर्वच देशाला होऊ लागला होता. मुसलमानांच्या विविध संस्थांनी हिजाब, शरिया, सीएएला विरोध असे आंदोलन सुरू केले आणि त्याच वेळी मूर्तिभंजनाच्या आपल्या धर्मसिद्ध अधिकारबजावणीसही सुरुवात केली.
22. भारतात मागे राहिलेला ग्रामीण मुसलमान आस्ते आस्ते भारतीय तत्वज्ञान झुगारून देत मोठ्या प्रमाणावर गलाकाटू तत्वज्ञान अंगिकारत आहे. मग त्यांची समृद्धि कुठून येणार? याचे उत्तर आहे-- हिंदूंच्या जिवावर. पण हिंदू तसं का होऊ देतील? कारण हिंदूंचे नेते तुष्टिकरणासाठी तशी सामाजिक-राजकीय व्यवस्था बनवतील. आता कुठे भारतातील हिंदूंमधे चर्चा सुरू झाली आहे की ७५ टक्के हिंदूच्या मंदिरातील पैशांवर व त्यांच्या टॅक्सवर अधिकारी सांगणाऱ्या त्या त्या राज्याच्या किंवा केंद्राच्या सरकारांना तुष्टीकरणाचे राजकारण खेळ्ण्याची परवानगी का द्यायची?
23. राजकारणी खेळी कशी असते पहा. जिहादींच्या हल्ल्यांच्या घटनांना हिंदू अजूनही "दहशतवाद" असे संबोधतात. खरे तर हल्लेखोर स्वतःच त्यांच्या युद्धाला 'पवित्र युद्ध' म्हणत असतात. पण याकडे साफ दुर्लक्ष करून, हिंदू नेते, हिंदू विचारक त्याला ‘आतंकवाद’ म्हणतात! हे म्हणजे वाघाला वाघजी, वाघमहाराज असे म्हणण्यासारखे आहे. न्यूमोनियाला हंगामी ताप म्हणणे ही मूलभूत चूक असते. रोग ओळखण्यात चूक,आणि तीही जर जाणीवपूर्वक केलेली चूक असेल तर त्यावर उपचार कसे होणार? जेव्हा असंख्य जिहादी वारंवार इस्लामी धर्मग्रंथांतील आदेश हे त्यांच्या कारनाम्याचे कारण सांगत असतात तेंव्हा एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे बौद्धिक अप्रामाणिकपणाच म्हणावा लागेल! त्यांच्यातील सौम्य जनांच्या भावना न दुखावण्याच्या नावाखाली मौन बाळगणे चूक आहे, कायदा आणि न्याय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही ते अन्यायकारक आहे.
24. राजकारणी खेळीचे दुसरे उदाहरण पाहू या. संविधान अंतर्गत मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी बँकडोअर एण्ट्रीची चाल राजकारण्यांनी खेळली त्यांना अल्पसंख्यांक हा बिल्ला लाऊन त्यांच्या साठी वेगळे अल्पसंख्यांक मंत्रालय निर्माण केले. त्याला मोठे बजेट दिले. आज त्यांची संख्सा 15-20 टक्के असून आम्ही दुर्बळ अस्पसंख्यांक नसून या देशावर हुकूमत करणारी जमात आहोत हे ते अभिमानाने सांगतात. अल्पसंख्यांक या वर्गीकरणांत ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी हे ही मोडतात. मात्र त्या मंत्रालयाचा सुमारे 95 टक्के वाटा मुसलमानांच्याच पदरांत पडतो. ही रकम निव्वळ तुष्टीकणासाठी वापरली जाते. प्रत्येक सरकार अशी आशा बाळगून असते की एकदा का एका हाती कुराण व दुसऱ्या हाती संगणक दिले की असे मुसलमान युवक- युवती गलाकाटू गँगमधे जाणार नाहीत. पण मूर्तजासारख्या कित्येक उच्चशिक्षित आतंकवाद्यांच्या उदाहरणावरून आपल्याला ध्यानात येते कि ही आशा बाळगतांना आपण असावघ राहून चालणार नाही. .
25. म्हणजे पुन्हा एकदा आपण भारतात हिंदू मुसलमान एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून उर्वरित भारताचे अजून तुकडे करून मुसलमानांना द्या या मनःस्थीतीचा स्वीकार करावां कां ? कारण १९४७ पूर्वी सर्वांनी हेच सांगितले होते. यासाठीच भारत तेरे टुकडे होंगे असे म्हणणाऱ्यांसोबत कांग्रेस, ममता, केजरीवाल उभे रहातात आणि त्यांना प्रभावीपणे व अडवले जावे यासाठी कुणी आवाज उठवत नाहीत. मला आठवते की कन्हैय्या कुमार व निर्भयाचे हत्यारे अशा दोन फाइलींवर केजरीवालने चालढकल करीत त्यांना दीर्घकाळ पडून ठेवले होते. मग हैद्राबाद येथील व्हेटरनरी डॉक्टरच्या रेपच्या घटनेचे पडसाद उमटू लागले तेंव्हा कुठे त्या फाइली उपराज्यपालांकडे पाठवल्या.
26. म्हणजे आपण तुष्टिकरणा-याच्या सापळ्यांत वारंवार अडकत रहाणार असे म्हणायचे कां? या तुष्टिकरणाचेच परिणाम आहेत की भारतात घुसलेल्या कोणत्याही रोहिंग्या वा बांगलादेशीला आपण देशाबाहेर काढू शकत नाही, काढू इच्छित नाही. अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या नावांवर त्यांना बँकडोअरने आरक्षणाच्या सुविधा दिल्या जातात. त्यांना वीज, पाणी, जमीन व घरे मोफत देणारेच निवडणूक जिंकून येतात. आम्ही भारत देशांत राज्य करण्यासाठी आलो होतो, आम्ही राज्य केले व पुढेही करत राहणार असे म्हणणाऱ्यांना प्रोत्साहन देत हिंदूचे एकच उत्तर आहे - आम्ही मेधावान आहोत, आम्ही शिकून अमेरिकेत, पश्चिमी देशांत निघून जातो. तिथे सुखाने नांदतो. इकडे तुम्ही कांहीही करा.
27. हिंदूंची ही भावना झाली त्याला इतिहासही आहे. पंजाबातून विस्थापित होऊन आलेल्या हिंदू- शिखांना तत्कालीन भारत सरकारने संरक्षण पुरवले नाही. काकडती थंडी असतांना व दिल्लीतील जामा मशीद ओस पडलेली असताना त्यांना तिथे एका रात्रींपुरताही निवारा गांधीच्या हट्टाग्रहामुळे मिळू शकला नाही. त्यांनी जमेल तसे इथे काही दिवस काढले व एकमेकांच्या मदतीने इंग्लंड, अमेरिका, कॅनडा येथे स्थलांतरण केले. आता इथे मागे भारताचे कांहीही होवो ही भावना बनली, जी आज भारतभर प्रस्थापित झाली आहे. तीच मनस्थिति मग आपल्याला कैराना सारख्या एखाद्या शहरातही दिसते. सरकार हिंदूंना संरक्षण देत नाही, तर मग आम्ही पळून जातो.
28. एक महत्वाचा मुद्दा अजून दिसतो. फाळणीनंतर पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र घोषित झाले. भारत मात्र हिंदू राष्ट्र घोषित झाले नाही. तिकडे हिंदूंचे वंशसंहार सुरू झाले इकडे- मुस्लिमांना सर्व तऱ्हेने भारतीय नागरिक म्हणून सुविधा, मानसन्मान देण्यांत आले. अगदी राष्ट्राध्यक्ष पदापर्यंतचा मान त्यांना दिला गेला.
29. पण इथली मुस्लिम लीडरशिप कशी होती? मुल्लामौलवींचे रूप आपल्याला गौहर आणि सरवर चिश्तिच्या रूपाने दिसते. राजकीय लीडरशीप ही अंसारी, ओवेसी, अब्दुल्ला, PFI, SDPI, यांच्या रूपात दिसते. यापैकी एकानेही कधी भारतात मुस्लिमांचे कणभरही भले झाल्याची कबुली दिली नाही. हमीद अंसारी तर उपराष्ट्रपती असूनही आयुष्यभर भारतात मुसलमान असुरक्षित असल्याची हाकाटी जाहीरपणे पिटत होते. भारताला संपवण्यासाठी ते पाकिस्तानी गुप्तचरांना स्वतःच्या पदाचा लाभ घेऊन सुविधा पुरवत होते असाही खुलासा आता समोर येतो. इथले मुस्लिम नेते मानभावीपणे सांगतात की भारतावर उपकार करण्यासाठी फाळणीच्या वेळी त्यांनी इथेच रहायचे ठरवले. ते उपकार कशा स्वरूपाचे होते? तर पाकिस्तानी राजवटीला भारतात आणून नापाक हिंदुस्तानला पाकिस्तान बनवायचे असा त्यांचा मानस होता. आता तर पटना, अजमेर, उदयपुर, अमरावती, केरळ येथील घटनांमधे त्यांचा 2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याची प्लानही उघडकीस येत आहे.
30. भारत बदलतो आहे तसा हिंदूंचा दृष्टिकोन बदलला आहे आणि त्यांनी बाटलेल्या मुसलमानांना परत स्वधर्मात आणण्यासाठी शुद्धी अथवा परावर्तन सुरू केले आहे. पण मुसलमानांवर निर्णायक विजय मिळविल्याशिवाय कोठल्याही देशातील जनजीवन निर्विघ्न होत नाही हा स्पेन ते फिलिपाइन्स एवढ्या विशाल प्रदेशातील बाराशे वर्षांचा अनुभव आहे. सातशे वर्षे हिंदुस्थानात हिंदूंच्या चारित्र्याची व संस्कृतीची विटंबना करणाऱ्या इस्लामचा पराभव हिंदूंनीच केला. भूतकाळात केलेल्या विभाजनाची पुनरावृत्ती वर्तमानकाळात करून भविष्यकाळ अधिकच रक्तरंजित करू असे कोणी धमकावत असेल तर त्यापुढे वाकण्याच्या मनस्थितीत आता हिंदू नाहीत. उलट त्यावर प्रभावी उपाय झाले पाहिजेत हे त्यांनी आता ओळखले आहे. या देशात इस्लाम पुन्हा वरचढ होऊ नये उलट पाकिस्तानी भूभाग घेऊन फाळणीचा डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न हिंदूंनी आता करायला हवा.
31. तुष्टिकरणासाठी फाळणी झाली. ती झाली नसती तर त्याच तुष्टिकरणातून भारतात इस्लामी राष्ट्र आणू पहाणाऱ्यांचे आजचे मनोधैर्य राहिले असते का? किंवा आतातरी का राहू द्यायचे? आज दीन दरिद्री भुकेकंगाल बनलेला पाकिस्तान तुकडे पडण्याच्या मार्गावर येणे हीच पाकिस्तानची नियती आहे. उलट शस्त्रशास्त्र संपन्न भारत आज अजिंक्य अजेय असा जगाच्या पाठीवर एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. मात्र फाळणी करून आता आपण उर्वरित मुसलमानांना तृप्त केले आहे, किंवा त्यांचे संरक्षकपद आपण घेतले आहे या अविर्भावात रहाणाऱ्या भारतीय नेत्यांना किंवा राजकीय पंडितांना हा प्लान कधी ओळखता आला नाही. आणि ओळखता आला तरीही आपण त्यांना प्रेमाने जिंकत आहोत ही भावना कधीकधी फार मोठा धोका निर्माण करते.
32. महासत्ता किंवा विश्वगुरू होण्यासाठी भारतीय संस्कृति टिकणे गरजेचे आहे. आज ब्रह्मदेशासारख्या छोट्या राष्ट्राने संस्कृति जपण्यासाठी त्यांच्या शांतिप्रिय संस्कृतीचा अनादर करणाऱ्या रोहिंग्यांचा मतदानाचा हक्क काढून घेऊन जगाला एक वेगळा पर्याय दाखवून दिले आहे. त्यामुळे देशांतील सर्व नागरिकांच्या समृद्धिचा प्रयत्न नक्की करा -- तीच भारतीय संस्कृती आहे, मात्र तिचाच विध्वंस करू पहाणाऱ्यांना वेळीच निर्बंध घाला हे तत्वज्ञान भारताने समजून घेतले पाहिजे. काश्मीरात कलम 370 संपवून किंवा सरकारी प्रॉपर्टीवर आपले आलीशान इमले उभारणाऱ्या मुस्लिम संस्थांविरुद्ध बुलडोझर चालवून, किंवा लाऊडस्पीकर्सवरून पर्यावरण दूषित करणाऱ्यांना सुमार्गावर आणून भारतियांनी याची सुरूवात केली आहेच. तिला चिंतनाची जोड देऊया.
-------------------------xxxxxxxxxxxxx------------------------------